शामली : ऊन साखर कारखान्याने २०१९-२० या गळीत हंगामातील ऊस बिले केली आहेत. आता या परिसरातील शामली आणि थानाभवन साखर कारखान्याकडे ऊस बिलांपोटी ८२.२५ कोटी रुपये थकीत आहेत. कारखान्यांनी ३१ जानेवारीअखेर शेतकऱ्यांना पैसे द्यावेत असे आदेश जिल्हाधिकारी जसजित कौर यांनी सांगितले आहेत.
येथील साखर कारखान्यांनी २०१९-२० या गळीत हंगामात एकूण ३७८.१२ लाख क्विंटल ऊस खरेदी केला होता. त्यापोटी शेतकऱ्यांना १२१६.५९ कोटी रुपये देणे आवश्यक होते. आतापर्यंत ११३४.३४ कोटी रुपये म्हणजेच ९३.२४ टक्के पैसे देण्यात आले आहेत. ऊन साखर कारखान्याने सर्व ३३७.२२ कोटी रुपये देण्यात आले आहेत. तर शामली साखर कारखान्याकडे ४४.६१ कोटी रुपये आणि थानाभवन साखर कारखान्याकडे ३७.६३ कोटी रुपये थकबाकी आहे. जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिंह यांनी सांगितले की, ३१ जानेवारीपर्यंत सर्व पैसे शेतकऱ्यांना मिळतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक आयोजित करून जर शेतकऱ्यांनी पूर्ण पैसे दिले नाहीत तर कारवाईचा इशारा दिला होता. सध्याच्या गळीत हंगामात आतापर्यंत शेतकऱ्यांना ऊस बिले मिळालेली नाहीत. सरकारने आद्याप एसएपी जाहीर केलेली नाही. त्यामुळे जेव्हा एसएपी जाहीर होईल, त्याचवेळी पैसे देण्याची प्रक्रिया सुरू होईल.
जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिंह म्हणाले, जर शेतकऱ्यांची इच्छा असेल तर ते कारखान्याकडून दर महिन्याला एक क्विंटल साखर घेऊ शकतात. जेव्हा शेतकऱ्यांना ऊस बिले पूर्णपणे अदा केले जातील, तेव्हा त्या रक्कमेचे समायोजन केले जाईल. शेतकरी जेव्हा साखर घेतील, तेव्हा त्यांना त्या दिवशीचा दर जीएसटीसह द्यावा लागणार आहे.