लखिमपूर-खीरी : गुलरिया साखर कारखान्याने चालू हंगामातील १५ जानेवारीपर्यंत खरेदी केलेल्या ऊसापोटी शेतकऱ्यांना पैसे अदा केले आहेत. कारखान्याच्या वाणिज्य विभागाचे अप्पर महाव्यवस्थापक तुषार अग्रवाल यांनी सांगितले की, गुलरिया साखर कारखान्याने चालू हंगामात जानेवारीच्या मध्यापर्यंत खरेदी केलेल्या उसापैकी एकूण ८ कोटी ८८ लाख २४ हजार रुपयांची ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पाठविण्यात आली आहेत.
यासोबतच गुलरीया कारखान्याने या वर्षी खरेदी केलेल्या ऊसापोटी आतापर्यंत एकूण १८४ कोटी पाच लाख ७५ हजार रुपयांची ऊस बिले दिली आहेत. शेतकऱ्यांनी कारखान्याला ताजा आणि साफ ऊस पाठवावा असे आवाहन कारखाना प्रशासनाने केले आहे. तर कोविड महामारीमुळे लसीकरण आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे अशी सूचनाही करण्यात आली आहे.