घोडगंगा कारखान्याच्या कामगारांची देणी भागवा : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : शिरूर येथील रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याकडून कामगारांचे २५ कोटी रुपये थकीत आहेत. कारखाना प्रशासनाने कामगारांना एक पगार आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम तत्काळ द्यावी, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. कामगारांची उर्वरित रक्कम टप्प्याटप्याने द्यावी, यासाठी साखर आयुक्त यांनी कारखाना प्रशासन आणि कामगार यांच्यात सामंजस्य करार करावा, अशी सूचनाही पवार यांनी दिली.

साखर संकुल येथे झालेल्या बैठकीला मंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, कारखान्याचे अध्यक्ष ऋषि पवार, आमदार अशोक पवार, दादा पाटील फराटे, कामगार नेते शिवाजीराव काळे, रवी काळे आदींची संयुक्त बैठक झाली. यावेळी पवार यांनी सूचना दिल्या. पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले कि, कारखान्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून संप सुरु आहे. कारखान्याचे कार्यालय बंद आहे. सर्व व्यवहार ठप्प आहेत. शेतकऱ्यांच्या एफआरपीचाही विषय आहे. त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी बैठक घेतल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here