रुडकी : इक्बालपूर साखर कारखान्याने २०२०-२१ या गळीत हंगामातील १६२ कोटी रुपये ऊस समित्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पाठवले आहेत. साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पंकज गोयल यांनी ही माहिती दिली.
उपाध्यक्ष गोयल म्हणाले, सन २०२०-२१ या गळीत हंगामाला १८ नोव्हेंबर २०२० रोजी सुरुवात झाली होती. कारखान्याने या सत्रामध्ये एकूण ४९.८९ लाख क्विंटल उसाचे गाळप केले होते. साखर कारखान्याच्यावतीने ऊसाची बिले ऊस समित्यांना पाठविण्यात आल्या आहेत. येथून हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठविले जातील. ऊस मंत्री स्वामी यतीश्वरानंद यांची नुकतीच भेट घेतल्याचे उपाध्यक्ष गोयल यांनी सांगितले. मंत्र्यांना गळीत हंगामातील बिले अदा करण्यात आल्याची माहिती देण्यात आल्याचे गोयल म्हणाले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link