मिरगंज : मीरगंज साखर कारखान्याने ऊस उत्पादकांकडून खरेदी केलेल्या १५ जानेवारीपर्यंतच्या ऊस बिलाची देयके शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहेत.
याबाबत लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या वृत्तानुसार, कारखान्याचे युनिट हेड आशिष शर्मा यांनी सांगितले की, कारखान्याने सोमवारी ४९८.८६ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. साखर कारखान्याने १५ जानेवारीपर्यंतची रक्कम शेतकऱ्यांना अदा केली आहे. २९ जानेवारीपर्यंत कारखान्याने ५८.३५ लाख क्विंटल उसाची खरेदी केली आहे. कारखान्याने आतापर्यंत १६५१८.०३ लाख रुपये शेतकऱ्यांना अदा केले आहे. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी माती आणि उसाच्या बियाण्यावर आवश्यक ती प्रक्रिया करावी, असे आवाहन यावेळी युनिट हेड शर्मा यांनी म्हणाले.