लोकनेते हिंदुराव नाईक- निंबाळकर साखर कारखाना सातारा, सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त दर देणार : माजी खासदार रणजितसिह नाईक-निंबाळकर

सातारा: स्वराज ग्रीन पावर अँड फ्युएल लिमिटेड संचालित लोकनेते हिंदुराव नाईक- निंबाळकर साखर कारखान्याच्या २०२४- २०२५ गळीत हंगामासाठी मिल रोलरचे पूजन कारखान्याचे संस्थापक माजी खासदार रणजितसिह नाईक- निंबाळकर व अॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर, ताराराजे नाईक-निंबाळकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी रणजितसिह नाईक-निंबाळकर म्हणाले की, आगामी गळीत हंगामाची तयारी पुर्ण झाली आहे. फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला पाहिजे, ही भुमिका घेऊन हा दुष्काळी भागातील जनतेसाठी कारखाना उभा केला आहे. फलटण तालुक्यातील इतर कारखान्यापेक्षा आतापर्यंत सर्वात जास्त दर देणारा कारखाना ठरला आहे.

माजी खासदार नाईक-निंबाळकर म्हणाले की, चालू हंगामातसुध्दा सातारा आणि सोलापूर दोन्ही जिल्ह्यात सर्वात दर देणार आहे, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. ते म्हणाले कि, सर्वांच्या सहकार्यातून देशातील सर्वाधिक उत्पन्न घेणारा कारखाना करण्याचे उद्दिष्ट आहे. नाईक-निंबाळकर म्हणाले की, शेतकरी हा केंद्र बिंदू मानून आपण काम करीत आहे. तरी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याला पाठवून सहकार्य करावे, असे आवाहनही रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी केले. यावेळी संचालक विनय ठाकूर, उषा घाडगे, संजय पवार, अमर जगताप ,राजू रणवरे,शिवाजी पाटील, मनोज होलम, गणपती नराळे,प्रदीप मोहिते, नितीन कर्णे, सचिन सावंत, रोहित नागटिळे, दादा जगदाळे , विनय पुजारी, सचिन शेंडगे व इतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here