गेल्या 48 तासात 278 महाराष्ट्र पोलीस जवान पॉझिटीव्ह

मुंबई : महाराष्ट्रामध्ये कोरोना महामारीचा फैलाव वाढतच आहे, ज्यामुळे राज्यातील सरकारची चिंता आधिक वाढली आहे. गेलया 48 तासात महाराष्ट्र पोलिसचे 278 जवान कोरोना पॉझिटीव आढळले आहेत. याबरोबरच महाराष्ट्र पोलीस कर्मचार्‍यांमध्ये एकूण 1,666 पॉझिटीव्ह प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये 473 उपचारानंतर बरे झाले आहेत आणि 16 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1,177 सक्रिय पॉझिटीव्ह प्रकरणे आहेत.

महाराष्ट्र पोलीसांनी आपल्या कोविड 19 संबंधीत कारवाई अहवालामध्ये माहिती दिली की, कोरोना संदर्भातील कामांच्या दरम्यान, ड्यूटीवर राहाताना 86 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. आणि लॉकडाउन कालावधी दरम्यान पोलीस कर्मचार्‍यांवरील आक्रमणांच्या बाबतीत 823 अभियुक्तांना अटक केली. राज्यामध्ये आतापर्यंत 41 आरोग्य सेवा अधिक़ार्‍यांवर आक्रमणे झाली आहेत. आतपर्यंत एकूण 22,543 लोकांना लॉकडाउन नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अटक करण्यात आले आहे. 69,046 वाहने जप्त केली आहेत आणि अपराध्यांकडून 5,19,63,497 दंड वसुल करण्यात आला. कोविड 19 चा महाराष्ट्रावर सर्वात अधिक परिणाम झाला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here