श्री विघ्नहर कारखान्याकडून को ८६०३२ प्रजातीच्या लागवडीला परवानगी : चेअरमन सत्यशील शेरकर

पुणे : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत ऊस लागवड धोरणाचा निर्णय घेण्यात आला. यानुसार, आडसाली लागवडीसाठी १ जून ते ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंतच्या कालावधीमध्ये को. ८६०३२, को.एम. ०२६५ या ऊस जातीच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी दिली. कारखान्यामार्फत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उधारी तत्त्वावर ऊस बेणे व ऊस रोपांचा पुरवठा केला जातो. जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी हिरवळीचे खतासाठी ताग बियाणाचा पुरवठा केला जातो. ठिबक सिंचन योजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्ष शेरकर यांनी सांगितले की, कारखान्याने गळीत हंगाम २०२५-२६ साठी पुरेसा ऊस उपलब्ध होण्याकरिता ऊस लागवड धोरण जाहीर केले आहे. लागवड हंगाम सन २०२४-२५ साठी ऊस लागवडीचे धोरण एक जूनपासून सुरू करण्याचे ठरविण्यात आले आहे. पूर्वहंगामी लागवडीसाठी दि. १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंतचा कालावधी देण्यात आला असून, त्यामध्ये को.८६०३२,को.एम. ०२६५, को. व्हिएसआय-१८१२१, व्हिएसआय- ०८००५ व पीडीएन १५०१२ या ऊस जातींच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. सुरू हंगामासाठी १ डिसेंबर २०२४ पासून को. ८६०३२, कोव्हिएसआय- १८१२१, पीडीएन- १५०१२, को – ९०५७ व व्हीएसआय ०८००५ या ऊस जातींच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. त्यातील डिसेंबर महिन्यात कोएम ०२६५ या ऊस जातीच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here