नवी दिल्ली : देशामध्ये पेट्रोल आणि डिजेलच्या किेंमती वाढतच आहेत. आज विसाव्या दिवशी सतत यांच्या किंमती वाढतच आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्ली मध्ये पेट्रोलच्या किंमतींमध्ये 21 पैसे प्रति लिटर तर डिजेलच्या दरात 17 पैसे प्रती लीटर वाढ करण्यात आली आहे. यानंतर दिल्लीमध्ये एक लीटर पेट्रोलची किमत 80.13 रुपये झाली आहे. आणि एक लीटर डिजेलसाठी तुम्हाला 80.19 रुपये द्यावे लागणार आहेत. याप्रकारे 20 दिवसांमध्ये डीजेल 10.80 रुपये प्रति लीटर महाग झाले आहे, पेट्रोलच्या किंमतीमध्येही जवळपास 10 रुपयांची वाढ झाली आहे.
7 जूनपासून पेट्रोलियम कंपन्यांनी आजपर्यंत 20 दिवस पेट्रोल-डिजेल च्या किंमतीमध्ये (पेट्रोलच्या दरात गेल्या बुधवारी वाढ केली गेली नव्हती) वाढ केली आहे. यापूर्वी 82 दिवसांपर्यंत दरामध्ये कोणतीही वाढ केली नव्हती. दिल्लीमध्ये पहिल्यांदाच पेट्रोल आणि डिजेल इतक्या महागड्या दराने विकले जात आहे.
तेलाच्या किंमतीत सातत्याने होत असणार्या वाढीमुळे विरोधी पक्षाने केंद्र सरकारवर निशाणा साधला. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गेल्या दिवसांमध्ये पेट्रोल डिजेल च्या किंमती परत घेण्याची मागणी करुन पीएम नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. बिहार चे नेता प्रतिपक्ष तेजस्वी यादव यांनी गुरुवारी आपल्या पक्षाच्या आमदारांसह सायकल मोर्चा काढला.
तेजस्वी यादव यांनी ट्वीट केले आहे की, 19 दिवस 19 वेळा, पेट्रोल डिजेलच्या किंमती वाढल्या आहेत. सातात्याने बेरोजगारी आणि कोरोना मुळे हाहाकार आणि आता महागाईचा हा सरकारी अत्याचार. शेतकरी, मजूर आणि गरीब विरोधी सरकारकडून पेट्रोल डिजेल च्या किंमतीमध्ये केल्या जात असणार्या दरावाढी विरोधात आमदारांसह सायकल मोर्चा काढला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.