नवी दिल्ली : सौदी अरब येथील अरामको तेल रिफाइनरी वरील हल्ल्यामुळे भारतात इंधनाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. कोटक इंस्टीट्यूशनल इक्विटीज च्या मतानुसार, भारतात पेट्रोल आणि डिझेल च्या किमतीमध्ये एका लिटरमागे ५ -६ रुपये वाढ होण्याची शक्यता आहे. भारतात ८३ टक्के इंधनाची आयात होते आणि सौदी अरब भारताचा सगळ्यात मोठा पुरवठादार आहे.
ड्रोन हल्ल्यामुळे अरामको च्या संयंत्रांमध्ये लागलेल्या आगीमुळे सौदी अरेबियातील रोजचे तेल उत्पादन आता निम्मच राहिल आहे. तरी, भारतात होणाऱ्या तेलाच्या पुरवठ्यावर याचा परिणाम होणार नसल्याचे अरामको ने सांगितले आहे. याबाबत बोलताना तेलमंत्री धमेंद्र प्रधान यांनी सोमवारी असे ट्वीट केले की, आंम्ही सप्टेंबरमध्ये तेल कंपन्यांच्या कच्च्या तेलाच्या आयातीचा आढावा घेतला आहे. भारताला करण्यात येणाऱ्या तेलाच्या पुरवठयामध्ये कुठलाही अडथळा येणार नसल्याचा, विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.
ग्लोबल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 19 टक्के महाग झाला असून 72 डॉलर प्रति बॅरल पर्यंत पोचला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.