नवी दिल्ली : भारतीय तेल कंपन्यांकडून दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचा लेटेस्ट दर अपडेट केले जातात. मात्र, देशात दीर्घ काळापासून इंधनाचे दर स्थिर आहेत. राज्य स्तरावरील करांमुळे विविध ठिकाणी इंधनाचे दर वेगवेगळे आहेत. सध्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील अनेक शहरात पेट्रोलचा दर प्रती लिटर १०० रुपयांपेक्षा अधिक आहे. मुंबई, श्रीगंगानगर आणि भोपाळमध्ये पेट्रोल १०० रुपये प्रती लिटरपेक्षा अधिक दराने विक्री केले जात आहे.
याबाबत iocl ने दिलेल्या माहितीनुसार, देशात सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये आहे. तेथे याची किमत ८४.१० रुपये तर डिझेल ७९.७४ रुपये लिटर आहे. मे २०२२ पासून आतापर्यंत इंधन दर बदललेले नाहीत.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, श्री गंगागनगरमध्ये पेट्रोल ११३.४८ तर डिझेल ९८.२४ रुपये प्रती लिटर आहे. मुंबईत याचा दर अनुक्रमे १०६.३१ आणि ९४.२७ रुपये प्रती लिटर आहे. जयपूरमध्ये १०८.४८ आणि ९३.७२ रुपये प्रती लिटर दराने पेट्रोल, डिझेलची विक्री सुरू आहे. चेन्नई, कोलकाता, भोपाल, पाटणा या शहरांतही पेट्रोल-डिझेलचे दर अशा स्थितीत आहेत. आयओसीएलने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपयांवर स्थिर आहे. तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रती लिटर आहे. चेन्नई पेट्रोल १०२.६३ आणि डिझेल ९४.२४ रुपये आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रती लिटर दराने विक्री केले जात आहे. तुम्ही एका SMSवर तुम्ही शहरातील पेट्रोल, डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP लिहून मेसेज ९२२४९९२२४९ वर पाठवावा लागेल. त्यानंतर काही क्षणात तुम्हाला अपडेट माहिती मिळेल.