नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ केली. दिल्लीत शुक्रवारी पेट्रोल २७ पैशांनी वाढून ९६.९३ रुपये प्रती लिटरवर पोहोचले. तर डिझेलच्या दरात २८ पैशांची वाढ होऊन डिझेल प्रती लिटर ८७.६९ रुपयांवर आले. राजस्थानमधील श्री गंगानगर येथे पेट्रोल १०८ रुपये आणि डिझेल १०० रुपये प्रती लिटर दराने विकले जात आहे.
उत्तर प्रदेशशी तुलना केली तर राजस्थानमध्ये पेट्रोल १४ रुपयांनी महागले आहे. लखनौमध्ये आज पेट्रोल ९४.१४ रुपये लिटरने विकले जात आहे. गेल्या २७ दिवसांमध्ये पेट्रोल ६.६१ रुपये आणि डिझेल ६.९१ रुपयांनी महागले आहे.
अनुपपूरमध्ये पेट्रोल १०७.७१ तर डिझेल ९८.७४ रुपये आहे. रिवा येथे पेट्रोल १०७.३४ आणि डिझेल ९८.४१ रुपये आहे. परभणीत पेट्रोल १०५.३८ तर डिझेल ९५.८९ रुपयांवर आहे. मुंबईत आता पेट्रोल १०३.०८ आणि डिझेल ९५.१४ रुपयांवर पोहोचले आहे.
पेट्रोल आणि डिझेलवर एक्साईज ड्यूटी, डीलर कमीशन आणि इतर करांचा समावेश झाल्यानंतर त्याचा दर दुप्पट होतो. केंद्र सरकार एक्साईज ड्यूटी आणि राज्य सरकार व्हॅट आकारते. ही रक्कम वजा केली तर डिझेल आणि पेट्रोल २७ रुपये लिटरने विकता येईल. मात्र, महसुलाच्या कमाईचा एक महत्त्वाचा भाग असल्याने दोन्ही सरकारांकडून यात कपात केली जात नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या दरावर आधारित पेट्रोल, डिझेलचे दर ठरवले जातात. दररोज सकाळी या दरांचा आढावा घेतला जातो. नागरिक एसएमएसद्वारे आपल्या शहरातील दर जाणून घेऊ शकतात. याशिवाय तेल कंपन्यांच्या वेबसाइटवर याची व्यवस्था करण्यात आली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link