पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा वाढ

नवी दिल्ली : देशभरात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे ३४ आणि ३५ पैशांची वाढ केली. त्यामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोल १०४.२२ रुपयांवर पोहोचले.

पेट्रोलियम कंपन्यांनी गेल्या आठवडाभरात अपवाद वगळता सर्व दिवस इंधन दरात वाढ केली. आता ताज्या दरवाढीनंतर राजधानी नवी दिल्लीमध्ये पेट्रोल ९९.८६ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ८९.३६ रुपये प्रती लिटर दराने विक्री होत आहे. तर मुंबईत डिझेलचा दर ९६.१६ रुपयांवर आला.

पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज सकाळी सहा वाजता इंधन दरात बदल केले जातात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीवर आधारीत हे दर ठरतात. मूळ तेलाचे दर कमी असून त्यावर केंद्र आणि राज्य सरकारच्यावतीने कर आकारणी केली जात असल्याने हे दर दुपटीने वाढतात.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here