नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ केली. डिझेलच्या दरात २८-३० पैसे तर पेट्रोल दरात २५-२६ पैशांची वाढ करण्यात आली. पहिल्यांदाच मुंबईत पेट्रोल १०० रुपयांवर पोहोचले आहे.
आज दिल्लीत पेट्रोलचा दर ९३.९४ रुपये तर डिझेलचा दर ८४.८९ रुपये प्रती लिटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १००.१९ तर डिझेल ९२.१७ रुपये प्रती लिटर झाले आहे.
आज दिल्लीमध्ये डिझेल ८४.८९ रुपये तर पेट्रोल ९३.९४ रुपये प्रती लिटर झाले. तर कोलकातामध्ये पेट्रोल ९३.९७ रुपये आणि डिझेल ८७.७४ रुपये प्रती लिटर झाले. चेन्नईत पेट्रोल ९५.५१ रुपये आणि डिझेल ८९.६५ रुपये प्रती लिटर झाले.
पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज सकाळी सहा वाजता दरात बदल केला जातो. एक्साझज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर कर जोडल्यानंतर मूळ दर दुप्पट होतो. कंपन्या दर स्वतः ठरवतात. विविध तेल कंपन्यांकडून प्रत्येक शहराचे दर एसएमएसद्वारे जाणून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय वेबसाईटवर अधिकृत दर समजू शकतात.