पेट्रोल-डिझेलचे दर अपडेट, जाणून घ्या नवे दर

नवी दिल्ली : पेट्रोलियम कंपन्यांनी आज, ८ फेब्रुवारी रोजी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी मंगळवारी इंधन दरात कोणताही बदल केलला नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत उसळी घेतली असतानाही राष्ट्रीय बाजारपेठेत दर स्थितीत आहेत. नोव्हेंबर २०२१ पासून दर ठेवण्यात आले आहेत. तज्ज्ञांच्या मते निवडणुका सुरू असल्याने दरवाढ करण्यात आलेली नाही.

सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर उच्चांकी स्तरावर आहेत. ब्रेंट क्रूड ९३ डॉलर प्रती बॅरल आहे. तरीही दरवाढ झालेली नाही. ३ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने इंधनावरील एक्साइज ड्यूटी कमी केली होती. तेव्हापासून दर कमी आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या अपडेटनुसार देशाची राजधानी दिल्लीत ८ फेब्रुवारी रोजी पेट्रोल प्रती लिटर ९५.४१ रुपये प्रती लिटर तर डिझेल ८६.६७ रुपये प्रती लिटर आहे. इंधनावरील व्हॅटमुळे वेगवेगळ्या राज्यात, शहरात दर वेगवेगळे असतात. महानगरांमध्ये मुंबईत पेट्रोल १०९.९८ रुपये प्रती लिटर तर दिल्लीत स्वस्त ९५.४१ रुपये प्रती लिटर आहे. व्हॅटमुळे इंधन दर वेगवेगळे असतात. पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलतात. सकाळी सहा वाजता ते अपडेट केले जातात. पेट्रोल डिझेलचे नवे दर तुम्ही SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP यासोबत आपल्या शहराचा कोड नंबर लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करू शकतात. BPCLचे ग्राहक RSP लिहून ९२२३११२२२२ या क्रमांकावर मेसेज करून माहिती मिळवू शकतात. तर HPCL चे ग्राहक HPPrice लिहून ९२२२२०११२२ या क्रमांकावर मेसेज पाठवून दर जाणून घेऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here