नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने देशातील प्रमुख शहरांमध्ये मंगळवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात घट झाल्याचे दिसून आले. आजच्या बदललेल्या किमतीनंतर १९ ते २२ पैशांची कपात पेट्रोलमध्ये झाली आहे. तर डिझेलचा दर २१-२३ पैशांनी उतरला आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात सोमवारी सलग चौथ्या दिवशी स्थिर ठेवल्या होत्या.
दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर मंगळवारी २२ पैशांच्या कपतीसह ९०.५६ रुपये प्रति लिटरवरह पोहोचला. तर सोमवारी हाच दर ९०.७८ रुपये होता. कालच्या तुलनेत देशाच्या राजधानीत डिझेलचा दर २३ पैशांनी कमी होऊन ८०.८७ रुपये लिटर झाला. मुंबईत आज पेट्रोलच्या दरात २१ पैशांची घट होऊन तो ९६.९८ रुपये झाला. तर एक लिटर डिझेलचा दर ८७.९६ रुपये झाला. कोलकातामध्ये पेट्रोल २१ पैशांच्या कपातीसह ९०.७७ रुपये प्रतिलिटर झाले आहे. डिझेलच्या दरात २३ पैशांची घट होऊन ८३.७५ रुपये प्रति लिटर दराने विक्री सुरू झाली.
चेन्नईत आज पेट्रोल १९ पैशांनी स्वस्त होऊन ९२.५८ रुपये प्रति लिटरने उपलब्ध झाले. तर डिझेलचा दर १९ पैशांनी कमी होऊन ८५.८८ रुपये प्रति लिटरवर आला. पाटणा येथे पेट्रोल ९२.८९ रुपये प्रति लिटर आहे, सोमवारच्या तुलनेत पेट्रोल २२ पैशांनी स्वस्त झाले आहे. तर डिझेल ८६.३५ रुपये लिटरवरून ८६.१२ रुपये लिटरवर आले आहे. लखनौमध्ये पेट्रोलचा दर १६ पैशांनी कमी होऊन ८८.८५ रुपये प्रति लिटर झाली आहे तर डिझेल ८१.२७ रुपये प्रति लिटर आहे.
पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल, डिझेलच्या दरात बदल करण्यात येतो. पेट्रोल, डिझेलवर एक्साईज ड्युटी, डीलर कमीशनसह इतर कर आकारले जातात. दरातील बदलांची माहिती एसएमएसद्वारे मिळवता येते.