पेट्रोल, डिझेल दरवाढीचा पुन्हा भडका, मुंबईत पेट्रोलचा दर १००.४७ रुपये

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी पुन्हा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ केली. आज डिझेल २४ ते २८ पैसे तर पेट्रोल २८ ते २९ पैशांनी महागले. पहिल्यांदाच मुंबईत पेट्रोलचा दर १०० रुपये प्रती लिटरवर पोहोचला आहे.
आज दिल्लीत पेट्रोलचा दर ९४.२३ रुपये तर डिझेल ८५.१५ रुपये प्रती लिटर झाला तर मुंबईत पेट्रोलचा दर १००.४७ रुपये आणि डिझेलचा दर ९२.४५ रुपये प्रती लिटर झाला. कोलकातामध्ये पेट्रोल ९४.२५ रुपये प्रती लिटर तर डिझेल ८८ रुपये प्रती लिटरवर पोहोचले. चेन्नईत पेट्रोल ९५.७६ रुपये आणि डिझेल ८९.९० रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या दरावर आधारित दररोज पेट्रोल, डिझेलचे दर बदलले जातात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदूस्थान पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल, डिझेल दरात सुधारणा केली जाते.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक्साइज कर, डिलर कमीशन आणि इतर बाबी समाविष्ट केल्यानंतर हे दर दुपटीने वाढतात. जर केंद्र सरकारने अबकारी कर आणि राज्य सरकारने व्हॅट हटवला तर इंधन दर निम्म्याने कमी होऊ शकतात.

आपण आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर दररोज एसएमएसद्वारे तपासू शकतो. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार ग्राहकांना RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागतो. प्रत्येक शहराचे कोड स्वतंत्र आहेत. त्याची माहिती इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here