पेट्रोल, डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ, जाणून घ्या किंमत

इंधन वितरण कंपन्यांनी आज, पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोलचा दर ७६ ते ८४ पैशांनी वाढला आहे. तर डिझेल ७६ ते ८५ पैशांनी वाढले आहेत. दिल्लीत एक लिटर पेट्रोल ९८.६१ रुपये प्रती लिटर तर डिझेल ८९.८७ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे.

मुंबईत पेट्रोल ११३.३५ रुपये आणि डिझेल ९७.५५ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर ९३.०१ रुपये तर डिझेलचा दर १०८.०१ रुपये प्रती लिटर आहे. तर चेन्नईत पेट्रोल १०४.४३ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९४.४७ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे. गेल्या वर्षी ४ नोव्हेंबरनंतर दोन्ही इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली नव्हती.
केंद्र सरकारने पाच राज्यांतील निवडणुकांमुळे तेल कंपन्यांना दरवाढ करण्यास रोखल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर ११२ डॉलर प्रती बॅरलवर पोहोचल्यानंतर रविवारी तेल कंपन्यांनी डिझेलच्या घाऊक खरेदी दरात २५ रुपये प्रती लिटरची वाढ केली होती. किरकोळ दरात हळूहळू वाढ करण्यात येणार असल्याचे इंधन वितरकांचे म्हणणे आहे. पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलतात. सकाळी सहा वाजता ते अपडेट केले जातात. पेट्रोल डिझेलचे नवे दर तुम्ही SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP यासोबत आपल्या शहराचा कोड नंबर लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here