नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेलची दरवाढ थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. शनिवारी पेट्रोल, डिझेलचे दर देशभरात सलग चौथ्या दिवशीही वाढले. ३५ पैशांच्या दरवाढीनंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल १०७.२४ रुपये प्रती लिटर झाले तर डिझेलही वाढून ९५.९७ रुपयांवर पोहोचले आहे.
मुंबईत पेट्रोल आणि डिझेलची किंमत अनुक्रमे ११३.१२ रुपये आणि १०४.०० रुपये प्रती लिटर झाली आहे. कोलकातामध्ये अनुक्रमे १०७.७८ रुपये आणि ९९.०८ रुपये दराने विक्री सुरू आहे. चेन्नईत पेट्रोल १०४.२२ रुपये आणि १००.२५ रुपये प्रती लिटर झाले आहे. देशातील इंधनाच्या वाढत्या दरात लवकर घट होण्याची शक्यता नाही. इंधनाचा पुरवठा आणि मागणी या मुद्यावर केंद्र सरकारकडून अनेक तेल निर्यातदार देशांशी चर्चा सुरू आहे. मात्र, त्यामुळे किंमतीमध्ये दिलासा मिळेल अशी स्थिती नाही.