नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेलच्या महागाईमुळे सर्वसामान्य लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, महागाई थांबण्याची चिन्हे दृष्टीपथात नाहीत. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग चौथ्या दिवशी दरवाढ झाली. पेट्रोल ३५ पैशांच्या वाढीसह दिल्लीत प्रती लिटर १०८.९९ रुपयांवर पोहोचले. तर डिझेलच्या दरातही ३५ पैशांनी वाढ करून ते १०५.८६ रुपयांवर आले.
मुंबईत पेट्रोलची किरकोळ विक्री किंमत ११४.८१ रुपये तर डिझेलचा दर १०५.८४ रुपये प्रती लिटर झाला आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०९.४६ रुपये प्रती लिटर आणि डिझेल १००.८४ रुपे प्रती लिटर दराने मिळत आहे. चेन्नईत पेट्रोल, डिझेलचा दर अनुक्रमे १०५.७४ रुपये प्रती लिटर आणि १०१.९२ रुपये प्रती लिटरवर आहे.
यांदरम्यान, तेल पुरवठा आणि मागणीच्या मुद्यावर केंद्र सरकारकडून अनेक तेल निर्यातदार देशांशी चर्चा सुरू आहे. मात्र, दरात तत्काळ दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने अलिकडेच तेल उत्पादक देशांशी दर आणि पुरवठा, तेलाच्या मागणीविषयी चिंता व्यक्त केली.