नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिजेलच्या किमतीमध्ये शनिवारी सलग तिसर्या दिवशी वाढ कायम राहिली. देशाची राजधानी दिल्ली मद्ये पेट्रोलचा दर पुन्हा एकदा 82 रुपये प्रति लीटरपेक्षा अधिक झाला आहे आणि डिजेलचा दरही 72 रुपये प्रती लीटर इतका आहे. तेल विपणन कंपन्यांनी शनिवारी पेट्रोलच्या किमतीमध्ये दिल्लीमध्ये 24 पैसे, कोलकाता मध्ये 23 पैसे, मुंबई मध्ये 29 पैसे तर चैन्नई मध्ये 21 पैसे प्रति लीटरची वाढ केली. तर डीजेलच्या किमतीमद्ये दिल्ली आणि कोलकाता मध्ये 27 पैसे तर मुंबईमध्ये 28 पैसे आणि चेन्नई मध्ये 26 पैसे प्रति लीटरची वाढ करण्यात आली आहे.
या महिन्यात पेट्रोल आणि डीजेलच्या किमतीमध्ये आतापर्यंत आठ वेळा वाढ झाली आहे ज्यानंतर देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल च्या किमतीमध्ये 97 पैसे प्रति लीटर वाढ झाली आहे, तर डीजेल 1.67 रुपये प्रति लीटर महाग झाले आहे.
इंडियन ऑईल च्या वेबसाईटनुसार, दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई मध्ये पेट्रोलच्या किमती वाढून क्रमश: 82.13 रुपये, 83.67 रुपये, 88.87 रुपये आणि 85.12 रुपये प्रति लीटर झाल्या आहेत. चारही महानगरांमध्ये डिजेलच्या किमती वाढून क्रमश: 72.13 रुपये, 75.70 रुपये, 78.66 रुपये आणि 77.56 रुपये प्रति लीटर झाली आहे.