नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत तेजी असूनही सलग ५१ व्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झालेला नाही. दिल्लीत २ डिसेंबर रोजी व्हॅट कमी केल्यानंतर पेट्रोल ८ रुपयांची कमी झाले. त्यानंतर दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपेय प्रती लिटर आणि डिझेल ८६.६७ रुपये प्रती लिटरवर स्थिर आहे. आठवडाभरात ब्रेंट क्रूड ०.२० टक्के तेजीसोबत ७४.१३ डॉलर प्रती बॅरल आणि अमेरिकन क्रूड ०.४६ टक्के खालावून ७१.४५ डॉलर प्रती बॅरल झाले.
देशांतर्गत बाजारात ५१ व्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत व्हॅट कमी केल्यानंतर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (बीपीसीएल) पंपावर पेट्रोल ९५.४१ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ८६.६७ रुपये प्रती लिटर आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरात दररोज आढावा घेतला जातो. त्या आधारावर दररोज सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात.
सध्या मुंबईत पेट्रोल १०९.९८ तर डिझेल ९४.१४ रुपये प्रती लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल १०१.४० रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९१.४३ रुपये प्रती लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०४.६७ रुपये आणि डिझेल ८९.७९ रुपये प्रती लिटर आहे.