पेट्रोल-डिझेल दर : कच्च्या तेलाच्या दराने घेतली उसळी

रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान सुरू असलेल्या युद्धादरम्यान कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये जबदरस्त वाढ होत आहे. शनिवारी, ५ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल ११८ डॉलर प्रती बरलहून अधिक स्तरावर पोहोचले. तर ४ मार्च रोजी कच्चे तेल १११.५ डॉलर प्रती बॅरल होते. एका दिवसात ७ डॉलरची दरवाढ झाली आहे. दुसरीकडे भारताची प्रमुख ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी ५ मार्च रोजी पेट्रोल, डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. इंधन दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यापू्र्वी १२२ दिवसांपूर्वी पेट्रोल-डिझेलचे दर बदलले होते.

देशभरात दर स्थिर असले तरी ज्या कच्च्या तेलापासून पेट्रोल, डिझेल बनते, त्याचे दर सातत्याने वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल ११८.१ डॉलर प्रती बॅरल झाले आहे. भारतात जेव्हा पेट्रोल, डिझेलवरील करात कपात झाली होती, तेव्हा कच्चे तेल ८० डॉलर प्रती बॅरलवर होते. गेल्या चार महिन्यांत यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. मात्र, कच्चे तेल ४० डॉलर प्रती बॅरलने वाढले आहे. oilprice.com वरील माहितीनुसार WTI Crudeचा दर ७.४४ टक्के वाढून ११५.७ डॉलर झाला आहे. तर ४ मार्चला हा दर १०९.३ डॉलर होता. ब्रेंट क्रूडमध्येही खूप वाढ दिसत आहे. त्याची किंमत ६.९३ टक्क्यांनी वाढून ११८.१ डॉलरवर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here