पेट्रोल-डिझेल दर : इंधन कंपन्यांकडून दर जैसे थे

इंधन कंपन्यांनी आज, दुसऱ्या दिवशीही पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. दिल्लीत आज एक लिटर पेट्रोल १०५.४१ रुपये तर डिझेल ९६.६७ रुपये प्रती लिटर आहे. मुंबईत पेट्रोल १२०.५१ रुपये आणि डिझेल १०४.७७ रुपये प्रती लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल ११५.१२ रुपये तर डिझेल ९९.८३ रुपये प्रती लिटर आहे. तर चेन्नईत पेट्रोल ११०.८५ रुपये प्रती लिटर असून डिझेल १००.९४ रुपये प्रती लिटर आहे. गेल्या वर्षी ४ नोव्हेंबरपासून २२ मार्चपर्यंत इंधन दरात कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती.

केंद्र सरकारने पाच राज्यांतील निवडणुकांमुळे तेल कंपन्यांना दरवाढ करण्यास रोखल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर ११२ डॉलर प्रती बॅरलवर पोहोचल्यानंतर रविवारी तेल कंपन्यांनी डिझेलच्या घाऊक खरेदी दरात २५ रुपये प्रती लिटरची वाढ केली होती. किरकोळ दरात हळूहळू वाढ करण्यात येणार असल्याचे इंधन वितरकांचे म्हणणे आहे.

सध्या मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोल १०० रुपयांच्या वर प्रती लिटर दरात मिळत आहे. महानगरांपैकी मुंबईत इंधन दर सर्वाधिक आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलत असतात. सकाळी सहा वाजता हे दर बदलले जातात. पेट्रोल-डिझेलचा दर तुम्ही SMS च्या माध्यमातूनही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP लिहून शहराच्या कोड नंबरसह ९२२४९९२२४९ या क्रमांकावर मेसेज पाठवून दराची माहिती घेऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here