पेट्रोल-डिझेल दर : कच्चे केल १३० डॉलरवर, सर्वसामांन्य नागरिक धास्तावले

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतींनी उसळी घेतली आहे. सोमवारी म्हणजे, ७ मार्च २०२२ रोजी सकाळी जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत १३० डॉलरवर पोहोचली. त्याआधी कच्च्या तेलाने २०१२ मध्ये १२८ डॉलरचा टप्पा ओलांडला होता. आज दुपारी २ वाजून ६ मिनिटांनी ब्रेंट क्रूडची किंमत १३०.३ डॉलर प्रती बॅरलवर गेला. यापूर्वी गुरुवारी, कच्च्या तेलाने ११५ डॉलरचा आकडा पार केला होता. सप्टेंबर २००८ नंतर हा उच्च स्तर होता.

दुसरीकडे देशात पेट्रोल, डिझेलचे दर अद्याप स्थिर आहेत. मात्र, ही स्थिती आणखी फार काळ टिकणार नाही. उपलब्ध माहितीनुसार, पुढील काही दिवसांत तेलाच्या दरात मोठी वाढ होऊ शकते. विधानसभा निवडणुकीमुळे कच्च्या तेलाची दरवाढ झालेली नाही. मात्र, १० मार्च रोजी निकाल जाहीर होईल. त्यानंतर दरवाढ होऊ शकते. सध्या दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये तर डिझेल ८६.६७ रुपये प्रती लिटरवर आहे. तर आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल १०९.९८ रुपये आणि डिझेल ९४.१४ रुपये प्रती लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०४.६७ रुपये प्रतीलिटर आणि डिझेल ८९.७९ रुपये प्रती लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल १०१.४० रुपये आणि डिझेल ९१.४३ रुपये प्रती लिटर दराने विक्री सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here