Ethanol Boost- हरित ईंधनामुळे पाच वर्षात भारतातील पेट्रोलचा वापर संपुष्टात येईल : नितिन गडकरी

अकोला : भारताने पेट्रोलियम उत्पादनाच्या आपल्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इथेनॉल उत्पादनाला पाठबळ दिले आहे. २०२५ पर्यंत वीस टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आणि त्यासाठी केंद्र सरकार आवश्यक ती पावले उचलत आहे. आता याच अनुषंगाने बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हरित इंधनामुळे (Green fuel) पाच वर्षानंतर देशातील वाहनांमध्ये पेट्रोलच्या वापराची गरज संपुष्टात येईल असा विश्वास व्यक्त केला.
मंत्री गडकरी यांना अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ सायन्स मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मंत्री गडकरी म्हणाले की, हरित हाइड्रोजन, इथेनॉल आणि अन्य हरित ईंधन देशाचे भविष्य आहे. आणि पाच वर्षानंतर देशातील पेट्रोलचा वापर जवळपास संपुष्टात येईल. देशातील प्रत्येक कार अथवा स्कूटर एकतर हरित हायड्रोजन, इथेनॉल फ्लेक्स इंधन, सीएनजी अथवा एलएनजीवर चालेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here