पणजी : गोवा येथे ५ ते ८ फेब्रुवारी २०२४ यांदरम्यान पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळा (PNGRB) च्या नेतृत्वाखाली आयोजित भारत ऊर्जा सप्ताहा (IEW)-2024 दरम्यान पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामकांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत बांगलादेश, इंडोनेशिया, मलेशिया, श्रीलंका आणि थायलंडमधील प्रमुख दक्षिण आणि आग्नेय आशियाई राष्ट्रीय ऊर्जा नियामक प्राधिकरणांसह आंतरराष्ट्रीय उद्योगातील प्रमुख उपस्थित होते. एसएंडपी ग्लोबल कमोडिटी इनसाइट्स या परिषदेचे नॉलेज पार्टनर होते.
नैसर्गिक वायू विकासाचा मार्ग मोकळा करणे” ही या परिषदेची विस्तृत थीम आहे. त्यात जलद आणि खोल उत्सर्जन कमी करण्यासाठी नैसर्गिक वायूच्या भूमिकेवर जोर देण्यात आला, जो उदयोन्मुख आणि विकसनशील देशांच्या हवामान बदलाच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. या परिषदेत पाच पूर्ण सत्रांमध्ये ऊर्जा सुरक्षा, जलद पायाभूत सुविधांचा विकास, सार्वजनिक-खाजगी भागीदारी आणि संस्थात्मक विकासावर परिणाम करणाऱ्या भू-राजकीय अनिश्चितता यासह विविध विषयांचा समावेश करण्यात आला. या परिषदेचा एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय नियामकांच्या विशेष गोलमेजाने ऊर्जा सुरक्षा वाढविण्यासाठी आणि प्रभावी शासन सुनिश्चित करण्यासाठी सर्वोत्तम पद्धती आणि सीमापार प्रतिबद्धता धोरणे सामायिक करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान केले.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी या कार्यक्रमाला संबोधित केले. भारताच्या ऊर्जा मिश्रणात नैसर्गिक वायूचा वाटा ६ टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेचा त्यांनी उल्लेख केला. या उपक्रमाबद्दल त्यांनी ‘पीएनजीआरबी’चे कौतुक केले. मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आगामी काळात तेल आणि वायू नियामकांची आंतरराष्ट्रीय नियामक परिषद आयईडब्ल्यूचा अविभाज्य वैशिष्ट्य बनविण्यावर भर दिला. दरम्यान, पीएनजीआरबीचे अध्यक्ष डॉ. अनिल कुमार जैन यांनी नैसर्गिक वायू क्षेत्राच्या विकासासाठी प्रभावी नियामक फ्रेमवर्क तयार करण्यासाठी ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियाई देशांमधील प्रादेशिक सहकार्याच्या महत्त्वावर भर दिला.
या संवादात भारताच्या नैसर्गिक वायू नियामक आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर प्रकाश टाकण्यात आला. विशेषत: शहरी गॅस वितरण क्षेत्र आणि विश्वासार्ह आणि परवडणारी स्वच्छ ऊर्जा प्रदान करण्यासाठी एकूण पायाभूत सुविधांचा विकास या विषयावर चर्चा झाली. उद्योगातील प्रमुख नेत्यांनी दक्षिण आणि आग्नेय आशियाई देशांमध्ये परस्पर जोडलेल्या वायू आणि वीज ग्रीडद्वारे प्रादेशिक स्वच्छ ऊर्जा धोरणाच्या गरजेचे समर्थन केले. पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटर्सची इंटरनॅशनल कॉन्फरन्स तज्ज्ञांच्या मेळाव्याचे काम करत आहे. यातून विविध भागधारकांना नेटवर्क, ज्ञानाची देवाणघेवाण आणि नैसर्गिक वायू क्षेत्राच्या विकासाच्या भविष्याला आकार देण्यासाठी भागीदारी तयार करण्याची संधी प्रदान केली जाते.