फगवाडा : पंजाबचे कृषी मंत्री कुलदीप धालीवाल यांच्यासोबत बैठकीनंतर शेतकऱ्यांनी रविवारी फगवाडा साखर कारखान्याच्या ऊस थकबाकीप्रश्नी गेल्या २८ दिवसांपासून सुरू केलेले आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली.
याबाबत BKU (Doaba) चे उपाध्यक्ष कृपाल सिंह मुसापूर यांनी सांगितले की, त्यांनी अमृतसरमध्ये मंत्री धालावील यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. साखर कारखान्याकडून थकीत असलेल्या ७२ कोटी रुपयांची मागणी शेतकरी करत आहेत. मुसापूर यांनी सांगितले की, साखर कारखान्याची संपत्ती विक्री करून २३.७६ कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. बीकेयू (दोआबा)चे महासचिव सतनाम सिंह साहनी यांनी सांगितले की, राज्य सरकारने त्यांना उर्वरीत थकबाकी देण्यासाठी पर्याय शोधले जातील असे आश्वासन दिले आहे.