फगवाडा : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच मिळणार थकबाकी

फगवाडा : फगवाडातील गोल्डन संधार साखर कारखान्याकडून खरेदी करण्यात आलेल्या उसापोटी ५,७०० शेतकऱ्यांना २३.७६ कोटी रुपयांची थकीत असलेली बिले देण्यासाठी तयारी सुरू आहे. फगवाडाचे उपजिल्हाधिकारी सतवंत सिंह यांच्याद्वारे स्थापन करण्यात आलेल्या एका उप समितीने ऊस बिले देण्यास पात्र ५,७०० शेतकऱ्यांची ओळख पटवली आहे. उप समितीमध्ये महसूल अधीक्षक, जीएसटी निरीक्षक आणि जिल्हा कोषागार कार्यालयाचे अधिकारी यांचा समावेश होता. त्यांनी सांगितले की, हरियाणातील फतेहबाद जिल्ह्यातील भुना तालुक्यातील कारखान्याची एक जमीन विक्री केल्यानंतर राज्य सरकारला २३.७६ कोटी रुपये मिळाले आहेत. ते शेतकऱ्यांना हस्तांतरीत केले जातील.

त्यांनी सांगितले की, कारखान्यात शेतकऱ्यांच्या नावाची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. त्याची पडताळणी ९, १० आणि ११ सप्टेंबर या कालावधीत केली जात आहे. शेतकरी फगवाडा एसडीएम कार्यालयात १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत यावरील आक्षेप नोंदवू शकतात. ते म्हणाले की, शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदवल्यास त्याची दुरुस्ती करून यादी आयुक्त कार्यालयास पाठवली जाईल. त्यानंतर लगेच शेतकऱ्यांना रक्कम हस्तांतरीत होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here