मनिला : शुगर रेग्युलेटरी ॲडमिनिस्ट्रेशन (SRA)ने साखरेच्या किरकोळ किंमती कमी करण्यासाठी राष्ट्रपती मार्कोस यांच्या निर्देशानुसार या वर्षी ४,५०,००० मेट्रिक टन (MT) साखर आयात करण्याचा प्रस्ताव दिला आहे. कृषी सहाय्यक सचिव आणि उप प्रवक्ते रेक्स एस्टोपेरेज यांनी सांगितले की, एसआरएने राष्ट्रपती मार्कोस यांच्याद्वारे निर्देशीत आयात योजनेला अंतिम रुप देण्यास सुरुवात केली आहे.
राष्ट्रपती मार्कोस यांनी बाजारातील वाढत्या किमती रोखण्यासाठी साखरेचा दोन महिन्यांचा बफर स्टॉक तयार करुन ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. एसआरए साखर आयात योजनेचा मसुदा तयार करीत आहे. प्रस्तावित साखर आयातीचे प्रमाण या हंगामाच्या अखेरपर्यंत साखरेच्या बफर स्टॉकला कव्हर करेल. या महिन्याच्या सुरुवातीला शीत पेय उत्पादकांनी मार्कोस यांना २०२३ च्या पहिला तिमाहीमध्ये साखरेचे संकट रोखण्याची पूर्वकल्पना देत किमती स्थिर करण्याची मागणी केली होती. कन्फेडरेशन ऑफ शुगर प्रोड्यूसर्स असोसिएशन इंक (कॉन्फेड) आणि नॅशनल फेडरेशन ऑफ शुगरकेन प्लांटर्स (एनएफएसपी) ने सांगितले की, गळीत हंगामाच्या सुरुवातीला साखर उत्पादन एकूण खपाच्या तुलनेत कमी असल्याचे त्यांनी मान्य केले आहे.