मनिला : शुगर रेग्यूलेशन एडमिनिस्ट्रेशनने (एसआरए) नवा आदेश जारी करून अमेरिकेसोबत होणारा साखर निर्यातीचा निर्णय रद्द केला आहे. हा आदेश ४ एप्रिलपासून लागू होणार आहे. देशातील सर्व साखरेचा कोटा देशांतर्गत, स्थानिक बाजारास दिला जाईल असा निर्णय घेण्यात आला आहे.
देशामध्ये साखरेचे उत्पादन घटल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. देशात २.१९ मिलियन मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होईल अशी शक्यता होती. त्यापैकी ७ टक्के साखर अमेरिकेला निर्यात करण्यात येणार होती. मात्र, फेब्रुवारी अखेरपर्यंत फक्त १.२२ मिलियन मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे.
एसआरएचे प्रशासक हर्मेनगुडे सेराफिका यांनी सांगितले की, संचालक मंडळाने पहिल्यांदा एका नव्या आदेशाला मंजूरी दिली आहे. सध्याच्या साखर वितरणाच्या कोट्यात यामुळे बदल केला जाईल. देशांतर्गत साखरेचे वितरण सुरळीत रहावे यासाठी हे बदल केले गेले आहेत. एसआरए आपल्या वार्षिक साखरेचा कोटा १ तारखेला जारी करते. सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या वार्षिक पिक उत्पादनासाठी संस्थेच्या धोरणावर आधारित हे निर्णय असताता. साखरेच्या आयात आणि निर्यातीसोबतच उत्पादनाच्या अनुमानावर आधारित देशांतर्गत बाजारातील स्थितीचे नियोजन केले जाते, असे सेराफिका यांनी सांगितले.