फिलिपाईन्समध्ये साखर तुटवड्याने कोका-कोलाच्या ४ प्लांट्सचे कामकाज बंद : मीडिया रिपोर्ट

मनिला : साखर पुरवठ्याच्या समस्येमुळे कोका-कोला बेवरेजेस फिलिपाइन्सने (Coca-Cola Beverages Philippines Inc) देशभरातील आपल्या चार प्लांट्समधील कामकाज अस्थायी रुपात बंद केले आहे.

GMA News Online मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कोका-कोला बेव्हरेजेस फिलिपाइन्स कॉर्पोरेट अँड रेगुलेटरी अफेअर्सचे संचालक जुआन लोरेंजो तानादा (Coca-Cola Beverages Philippines Corporate and Regulatory Affairs director Juan Lorenzo Tañada) यांनी “शुगर फियास्को” वर सीनेट ब्लू रिबन कमिटीकडून झालेल्या सुनावणीवेळी सांगितले की, साखरेचा पुरवठा अडचणीत आल्याने आम्हाला काही प्लांटमधील कामकाज तात्पुरत्या स्वरुपात बंद करावे लागले आहे. तानादा यांनी सांगितले की, तात्पुरत्या रुपात बंद करण्यात आलेल्या प्लांटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची आवश्यकता नाही. मात्र, त्यानंतरही त्यांना वेतन आणि मजुरी देण्यात येत आहे.

त्यांनी सांगितले की, Davao; Imus, Cavite; Zamboanga; Naga City, आणि Camarines Sur यामधील कोका – कोला युनीटमधील कामकाज सद्यस्थितीत बंद आहे. यापूर्वी, कोका -कोला फिलिपाइन्सने म्हटले होतो की, उद्योगाच्या वापरासाठी ४,५०,००० मेट्रिक टन प्रीमियम रिफाइंड साखरेची गरज भासेल. तरच ते आपल्या उत्पादन क्षमतेचा १०० टक्के वापर करू शकतात. आणि त्यांच्या ग्राहकांच्या ऑर्डर पूर्ण करू शकतील, जे आपल्या विक्रीसाठी उत्पादनांवर अवलंबून आहेत. तानादी यांनी सांगितले की, त्यांना अपेक्षा आहे, की सरकार बॉटलिंग उद्योगातील आव्हानांकडे लक्ष देईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here