मनिला: राष्ट्राध्यक्ष मार्कोस जर जनतेला परवडणाऱ्या दरात साखरेचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यााबाबत गंभीर असतील तर त्यांनी बेकायदेशीररीत्या आयात केलेल्या साखरेच्या जप्तीचे तत्काळ आदेश द्यावेत. अशा आयातदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी सिनेटर रिसा होन्टीवेरॉस यांनी केली आहे. जर चुकीच्या पद्धतीने साखर आयात करुन काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली तर सरकारला वारंवार बेकायदेशीर शीपमेंटची विल्हेवाट लावण्याची गरज भासणार नाही, असे हॉन्टीवेरॉस यांनी सांगितले.
देशात परवडणाऱ्या साखरेचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्याबाबत प्रशासन खरोखरच गंभीर असेल, तर त्यांनी ऑल एशियन काउंटरट्रेड, एडिसन ली मार्केटिंग आणि सडन या तीन आयातदारांनी बेकायदेशीररीत्या आयात केलेला साखर साठा ताबडतोब जप्त करायला हवा असे हॉन्टीवेरॉस म्हणाले. साखर ऑर्डरवर स्वाक्षरी होण्यापूर्वीच २० कंटेनरमधून आयात करण्यात आली असा आरोप त्यांनी केला. सुबिक आणि बटांगसमध्ये १२,००० मेट्रिक टन साखर जप्त करण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष मार्कोस यांनी जप्त केलेल्या साखरेची कडीवा केंद्रांमध्ये P७० प्रती किलोने विक्री करण्यास मान्यता दिली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. कृषी विभाग आणि साखर नियामक प्रशासनाला (SRA) साखरेबाबत अन्न सुरक्षा कायदा आणि इतर नियमांचे पालन केले आहे का याची खात्री करण्यासाठी इतर सरकारी संस्थांशी समन्वय साधण्याचे आदेश देण्यात आली आहे. बाजारात प्रक्रिया केलेल्या साखरेची किंमत पी ८६ आणि पी ११० प्रती किलोदरम्यान असल्याचे हॉन्टीवेरॉस म्हणाले. तस्करी केलेल्या ही साखर विक्री P७० ऐवजी P६२ प्रती किलो या नियमित नफा दराने विकली जावी अशी मागणी त्यांनी केली. तस्करी केलेल्या या साखरेची किंमत सुमारे P२४० मिलियन आहे.