फिलिपाइन्स : साखर आयात योजनेचा फेरविचार करण्याची मागणी

मनीला : शुगर रेग्युलेटरी अॅथॉरिटीच्या प्रस्तावित साखर आयात योजनेचा फेरविचार करण्याची गरज आहे, अशी मागणी सीनेटचे नेते जुआन मिगुएल जुबिरी यांनी केली आहे. ते म्हणाले की, आमच्या स्थानिक साखर उत्पादक शेतकऱ्यांनी पुन्हा आमच्या कार्यालयाशी संपर्क केला आहे. हे शेतकरी एसआरएच्या प्रस्तावाबाबत चिंतेत आहेत. देशात ३,५०,००० मेट्रिक टन साखर आयात करण्याची तयारी एसआरएन केली आहे. हा सौदा योग्य पद्धतीने आणि हेतूने केला जात नसल्याचा आरोप एसआरएवर लावला जाऊ नये याची खबरदारी घ्यावी. आपले शेतकरी पिक कापणीच्या तयारी असताना एसआरएला साखर आयातीची परवानगी देण्याची गरज नाही.

फेब्रुवारी महिन्यात सागे सिटी आणि हिमा मेलन सिटी रिजनल ट्रायल कोर्टाने शुगर ऑर्डर क्रमांक ३ अनुसार २,००,००० मेट्रिक टन साखर आयातीच्या विरोधात विविध आदेश जारी केले होते. ते म्हमआले की, मला अपेक्षा आहे की, एसआरएला या नुकसानीबाबत फेरविचार करण्यासाठी प्रेरीत करण्यात आले आहे. त्यांच्या आयात कार्यक्रमामुळे आमच्या स्थानिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर परिणाम होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here