फिलीपीन्स च्या मंत्र्यानी व्यक्त केली साखर दर वाढण्याची भिती
मनीला : फिलीपीन्स च्या कृषी मंत्र्यांनी सांगितले की, कोरोना वायरसचा फैलाव रोखण्यसाठी लॉकडाउन सारख्या प्रतिबंधात्मक उपाय केल्यामुळे देशातील प्रमुख दोन साखर कारखाने बंद आहेत. यामुळे घरगुती बाजारात साखरेची कमी आणि दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
कृषी सचिव विलियम दार ने बुकिडॉन चे गव्हर्नर जोस मारिया जुबीरी जूनियर यांच्याकडे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाउनमुळे निर्माण झालेलया नकारात्मक अर्थिक परिणामांना कमी करण्यासाठी काही सवलती मिळणे आवश्यक आहे. गव्हर्नर जोस मारिया जुबीरी जूनियर यांनी कोरोना रुग्णाच्या पहिल्या नोंदीनंतर 13 एप्रिलपासून 26 एप्रिलपर्यंत दक्षिणी प्रांतामध्ये लॉकडॉनची घोषणा केली. ज्यामुळे सर्वच उद्योग बंद आहेत. दार यांनी सांगितले की, क्रिस्टल शुगर कंपनी इंक आणि बुकिडॉन शुगर मिलिंग कंपनी यांनी गव्हर्नर च्या आदेशावरुन गाळप बंद केले आहे. दोन्ही कारखाने दक्षिण द्वीप मिंडानाओ च्या एकूण साखर उत्पादनाच्या 82 टक्के उत्पादन करतात, जे इतर देशाच्या एकूण उत्पादनात जवळपास 16 टक्के आहे.
फिलीपीन्स नियमित साखर आयातक नाही. पण ज्यावेळी आवश्यक असेल तर साधारणपणे तो देश थाईलंड कडून साखर खरेदी करतो. दार ने सांगितले की, लॉकडाउन मुळे दोन साखर कारखान्यांच्या जवळपास 19,000 कष्टकर्यांवर परिणाम केला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.