मनीला : औद्योगिक वापरकर्त्यांना साखर थेट आयात करण्याची परवानगी दिल्यास स्थानिक साखर उद्योग संपुष्टात येईल, अशी भीती नेग्रोस ऑक्सिडेंटल ५ चे जिल्हा प्रतिनीधी एमिलियो युलो III यांनी म्हटले आहे.
युलो यांनी दावा केला की, साखर उद्योगाला उदारमतवादी बनविण्याच्या योजनेमुळे (ज्यामध्ये यापूर्वी औद्योगिक वापरकर्त्यांकडून पुढे आणण्यात आले.) साखर उद्योग मरणासन्न स्थितीत पोहोचू शकतो. दरम्यान, सीनेटर जेव्ही एजेरसिटो, युनायटेड शुगर प्रोड्यूसर्स फेडरेशन (युनिफेड) आणि नॅशनल फेडरेशन ऑफ शुगरकेन प्लांटर्स (एनएफएसपी) नेसुद्धा डायकोनोच्या योजनेस विरोध दर्शविला आहे.
एका स्वतंत्र निवेदनात एनएफएसपीचे अध्यक्ष एन्रिक रोजस यांनी म्हटले आहे की, गोड पेय पदार्थ्यांच्या उत्पादकांना थेट साखर आयात करण्याची परवानगी दिली गेली तर (डियोकोनो योजना) साखर उद्योगावर दीर्घकाळापासून असलेले सरकारी नियमांवर गंडांतर येवू शकते. आणि यातून हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उपजिविका अधिक अस्थिर बनेल.
युनिफेडचे अध्यक्ष मॅन्युअल लामाटा यांनी म्हटले आहे की, ते काही औद्योगिक वापरकर्त्यांच्या बाजूने आयातीचे धोरण उदारमतवादी करण्याच्या डियोकोनो यांच्या निर्णयाच्या पूर्णपणे विरोधात आहेत. त्यांनी या प्रकरणात राष्ट्रपती मार्कोस यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. सध्याच्या कार्यपद्धतीनुसार, साखर नियामक प्रशासन देशातील खप, मागणी पूर्ण करण्यासाठी स्थानिक उद्योगाच्या क्षमता तपासणीनंतर साखर आयात आणि आयात करण्याचे प्रमाण यांची निश्चिती करते.