फिलीपींन्सची 250000 मेट्रीक टन साखर आयातीला परवानगी

फिलीपीन्समध्ये साखरेच्या संभावित किंमती वाढू नयेत यासाठी साखर नियामक प्रशासनाने (एसआरए) 250,000 मेट्रिक टन रिफाइंड साखरेच्या आयातीला मान्यता दिली आहे. साखरेच्या वाढत्या मागणीला याची मदत मिळेत, अशी आपेक्षा साखर नियामक प्रशासनाने व्यक्त केली.

साखरेच्या वाढणार्‍या किमंतीमध्ये स्थानिक निर्माता आणि प्रकिया करणारे काही महिन्यांपासून साखरेच्या आयातीची मागणी करत होते. आयात कार्यक्रम सर्वच औद्योगिक वापरकर्त्यांसाठी खुला आहे. ज्याचा लाभ खाद्य, मिठाई, बिस्कीट, पेय निर्माता, ग्राहक आणि विक्रेतेे, व्यापारी घेवू शकतात.100000 मेट्रीक टन औद्योगिक वापरकर्त्यांना वाटून देण्यात आला आहे, तर उरलेला 150,000 मेट्रीक टन ग्राहकांना आणि साखर उत्पादकांसाठी आहे. प्रथम या, प्रथम घ्या या आधारावर याचा लाभ घेता येईल.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here