फिलिपाइन्स : मतभेद दूर करण्यासाठी सर्व साखर संघटना, एसआरएची गव्हर्नरनी बोलावली बैठक

मनिला : साखरेच्या किमती घसरल्याने नेग्रॉस ऑक्सीडेंटलच्या अर्थव्यवस्थेला २०२५ मध्ये फटका बसेल, असे गव्हर्नर युजेनियो जोस लॅक्सन यांनी म्हटले आहे. त्यांनी साखर नियामक प्रशासनाच्या नेत्यांना आणि साखर क्षेत्रातील सर्व संघटनांना आपले मतभेद बाजूला ठेवून कमी किमतीची समस्या सोडवण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. जर अशीच स्थिती राहिली तर नेग्रोसच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होईल, असे ते म्हणाले.

लॅक्सन म्हणाले की, साखरेचे भाव का घसरत आहेत, हे ऊस बागायतदारांना समजत नाही ही मुख्य समस्या आहे. कारण जर तुम्ही मागणी आणि पुरवठा याचे पालन केले तर गेल्या वर्षभरात दर स्थिर असायला हवे होते. मला असे वाटते की, बाजारात रिफाइंड साखरेचा साठा जास्त आहे. काही साखर कारखानदार रिफाइंड साखर विकू शकत नाहीत, म्हणून ते रिफायनिंग करत नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here