मनिला :साखर उद्योगाला एप्रिल अखेरपर्यंत P१.५५ बिलियन कर्ज देण्यासह कृषी उद्योगाला पाठबळ दिले जाईल, असे फिलिपाइन्सची सरकारी बँक, लँडबँकने सांगितले. याबाबत लँडबँकेने म्हटले आहे की, P७००.४५ मिलियन मुल्याच्या कर्जापासून ४,३६६ जणांना सोशलाइज्ड क्रेडिट प्रोग्रॅम-ऊस विकास अधिनियमांतर्गत (SCP-SIDA) लाभ देण्यात आला आहे. शुगर नियामक प्रशासनासोबत (SRA) भागिदारीत हे कर्ज वितरीत केले जात आहे. लँडबँडचे अध्यक्ष आणि सीईओ लिनेट ऑर्टिज यांनी सांगितले की, लँडबँक कृषी क्षेत्रातील सर्व उद्योगांच्या विकासाला पाठबळ देण्यासाठी कटिबद्ध आहे. यामध्ये ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांच्या उत्पादन आणि उत्पन्नात वाढ करण्याचा समावेश आहे. SCP-SIDA च्या अंतर्गत आर्थिक मदतीमध्ये प्रती वर्ष २ टक्के कमी व्याज दराचा समावेश आहे.
SCP-SIDA चा उद्देश प्रगत आणि किफायतशीर कृषी पद्धतींना चालना देऊन ऊस क्षेत्राची उत्पादकता वाढवणे असा आहे. त्यातून शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करणे, उच्च गुणवत्तेच्या इनपूटची खरेदी आणि उच्च उत्पादन तसे पिकाच्या चांगल्या गुणवत्तेसाठी आवश्यक यंत्रसामुग्री घेण्यासाठी सक्षम बनवता येऊ शकेल. SCP-SIDA ने २,५७७ जणांना मदत दिली आहे, यामध्ये २,५६७ वेगवेगळे छोटे शेतकरी, चार सहकारी समित्या, पाच संघ आणि १६ वेगवेगळ्या प्रांतातील एक सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगाचा समावेश आहे.