मनिला : साखरेच्या पुरवठ्यातील तुटवड्यामुळे फिलिपाईन्स सरकारच्या आयात मोहिमेत अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे रिफाईंड साखरेच्या किरकोळ दरात सातत्याने वाढ होत आहे. यासंदर्भात Sugar Regulatory Administration ने (SRA) जारी केलेल्या दर पडताळणी अहवालानुसार बाजारात रिफाईंड साखरेच्या किरकोळ किमती ९ फेब्रुवारी रोजी P०.२२ होती. ती १६ फेब्रुवारीपर्यंत P६७.२९ प्रती किलो झाली आहे. मेट्रो मनिला सुपरमार्केटमध्ये रिफाईंड साखरेचा सरासरी दर दर आठवड्याला २ टक्क्यंनी वाढून P ६३.११ प्रती किलोपासून वाढून P६४.३० प्रती किलो झाला आहे.
एसआरएकडील डेटावरुन मिळालेल्या माहितीनुसार मेट्रो मनीलामध्ये प्रक्रियाकृत साखरेच्या किमती उच्चांकी स्तरावर आहेत. यापूर्वी आधीच्या पीक वर्ष २०१७-१८ मध्ये देशात साखरेच्या किमती पी ६५ प्रती किलोवर पोहोचल्या होत्या. तेव्हा फिलिपाइन्समध्ये साखरेची टंचाई होती. एसआरएच्या डेटा नुसार कच्च्या साखरेची सरासरी किंमत सलग दोन आठवड्यांपर्यंत पी ५० प्रतीकिलोच्या स्तरापासून उच्चांकावर आहे.