मनिला : फिलिपाइन्स सरकारने ३,००,००० मेट्रिक टन साखर आयातीची योजना रद्द केल्यानंतर राजधानी मनिलामध्ये प्रक्रिया केलेल्या साखरेची किरकोळ किंमत P१२६ प्रती किलो अशा उच्चांकी स्तरावर पोहोचली आहे. साखर नियामक प्रशासकांच्या देखरेख अहवालानुसार असे स्पष्ट झाले आहे की, मेट्रो मनीला सुपरमार्केटमध्ये रिफाईंड साखरेचा दर १२ ऑगस्ट रोजी P८६.५५ प्रती किलोग्रॅमच्या स्तरावरून P १२६ प्रती किलोच्या उच्च स्तरावर जावून पोहोचला.
साखर आयातीचा आदेश (एसओ) ४ परत घेतल्यानंतर काही दिवसांपासून साखरेच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. रिफाईंड साखरेचा दर पहिल्यांदाच पी १२५ प्रती किलोच्या स्तरापेक्षा अधिक झाला आहे. राष्ट्रपती मार्कोस यांनी अलिकडेच सातत्याने सांगितले आहे की, सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी साखरेच्या किमती कमी करण्याची गरज आहे. आठवड्याच्या आधारावर मेट्रो मनीला सुपर मार्केट आणि बाजारांमध्ये रिफाईंड साखरेच्या सरासरी किरकोळ दर पी ६.१६ आणि पी १.९३ प्रती किलोने वाढला आहे. रिफाईंड साखरेच्या किरकोळ किमतीमधील वाढीने घाऊक स्तरावर ३.६ टक्क्यांची तेजी दिसून आली आहे.