मनीला : शुगर रेग्युलेटरी अॅडमिनीस्ट्रेशन (एसआरए) बोर्डाने ४,४०,००० मेट्रिक टन रिफाइंड साखर आयात योजनेस मंजुरी दिली आहे. यावर्षीचा पुरवठा वाढवणे आणि किमती स्थिर ठेवणे हा यामागील उद्देश आहे. एसआरए बोर्डचे सदस्य -प्लांटर्सचे प्रतिनिधी पाब्लो लुइस अजकोना यांनी सांगितले की, एकूण २,००,००० मेट्रिक टन साखर आयात सामान्य ग्राहकांसाठी केली जाणार आहे. तर २,४०,००० मेट्रिक टन साखर पुढील दोन महिन्यांचा बफर स्टॉक असेल.
ते म्हणाले की, देशातील अनुमानीत खप दरमहा १,२०,००० मेट्रिक टन आहे. त्यामुळे यातुन पुढील दोन महिन्यांसाठी बफर स्टॉक तयार होईल. युनायटेड शुगर प्रोड्युसर्सचे अध्यक्ष अध्यक्ष मॅन्युअल लामाता यांनी सांगितले की, आयात साखरेमुळे किरकोळ किमती कमी होतील. ते म्हणाले की, ४,४०,००० मेट्रिक टन रिफाईंड साखर आयातीचे आम्ही समर्थन करीत आहोत.
गेल्या महिन्यात शीतपेय निर्मात्यांनी साखर तुटवड्याचे संकट रोखणे आणि साखरेच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी राष्ट्रपती मार्कोस यांनी २०२३ च्या पहिल्या तिमाहीत एक पूरक आयात कार्यक्रम लागू करण्यास सांगितले होते. साखर बागायतींच्या मालकांच्या समुहाने सांगितले की, साखर कारखान्यांचा हंगामाच्या सुरुवातीपर्यंत मागणीच्या तुलनेत उत्पादनात तुटवडा राहिल याचा त्यांना विश्वास वाटतो. यापूर्वी कन्फेडरेशन ऑफ शुगर प्रोड्युसर्स असोसिएशनने आधी सांगितले होते की, आयातीचे प्रमाण कमी राहावेत. ३,००,००० मेट्रिक टन रिफाईंड साखर आणि ५०,००० मेट्रिक टन कच्ची साखर जुलैपूर्वी आणली जावू नये. दुसरीकडे नॅशनल फेडरेशन ऑफ शुगरकेन प्लांटर्स अँड पन फेडरेशन ऑफ शुगरकेनचे शेतकरी केवळ ३,५०,००० मेट्रिक टन साखरेची आयात करावी अशी मागणी करीत होते.