Philippines: तस्करी केलेल्या साखरेची विक्री करण्याची योजना

मनिला : शुगर नियामक प्रशासनाने (एसआरए) कडिवा स्टोअर्समध्ये तस्करी केलेल्या प्रक्रिया केलेल्या ४,००० मेट्रिक टन साखरेच्या विक्रीकडे सर्वांची नजर लागली आहे, असे एसआरए बोर्डाचे सदस्य पाल्बो अजकोना यांनी सांगितले. अजकोना म्हणाले की, तस्करी केलेली साखर मे अखेरपर्यंत कडिवा स्टोअर्समध्ये विक्री केली जाईल. सरकारकडून गेल्यावर्षी सुरू करण्यात आलेल्या या स्टोअर्सचा उद्देश शेतकऱ्यांना आपली उत्पादने थेट ग्राहकांना कमी किमतीमध्ये विक्री करण्याची परवानगी देणे असा आहे.

शेतकऱ्यांचा समूह समहांग इंडस्ट्रिया एनर्जी अॅग्रिकल्चर (सिनेग) ने यापूर्वी सरकारकडे कडिवा स्टोअर्समध्ये तस्करी केलेल्या साखरेची विक्री करण्यावर आक्षेप घेतला होता. यादरम्यान, एसआरएने असेही सांगितले की, या साखरेची विक्री सुधारित किरकोळ विक्री दर P८५ प्रती किलो या दरानेच विक्री करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सरकारने फेब्रुवारीमध्ये ४,४०,००० मेट्रिक टन प्रक्रिया केलेल्या साखरेच्या आयातीस हिरवा कंदील दर्शवला आहे. त्यामध्ये देशांतर्गत बाजारपेठेसाठी २,००,००० मेट्रिक टन आणि बफर स्टॉकसाठी २,४०,००० मेट्रिक टन साखर कोटा मंजूर करण्यात आला आहे. मनिलाच्या बाजारात रिफाईंड साखरेचा दर P८६ ते P११० किग्रा यांदरम्यान आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here