बॅकॉलॉड सिटी : शुगर नियामक प्रशासनाने (एसआरए) सप्टेंबर महिन्यात साखर कारखाने सुरू करण्याचा निर्णय योग्य ठरवला आहे. शुगर काउन्सिलकडून ऑगस्ट महिन्यात गळीत हंगाम सुरू करण्याच्या मागणीनंतरही साखर कारखान्यांना सप्टेंबर महिन्यात कारखाने सुरू करावे लागतील.
शुगर नियामक प्रशासक पाब्लो अजकोना यांनी काल सांगितले की, ऊस परिपक्व होवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी कारखाने एक सप्टेंबर रोजी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ते म्हणाले की, छोट्या शेतकऱ्यांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने हा निर्णय SRA ने घेतला आहे. शेतकरी संघटनांनी दावा केला आहे की, शेतकरी या ऑगस्ट महिन्यात कारखान्यांकडून गळीत हंगाम सुरू होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. कारण, गेल्यावर्षी सुरुवातीचे पिक तोडणी झाल्यानंतर जी उसाची लागण करण्यात आली होती, तो ऊस पक्व झाला आहे. अजकोना म्हणाले की, २०२५ पर्यंत सरकारने साखर उत्पादन वाढीचा निर्णय घेतला आहे.
शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या एसआरए बोर्डाचे नवनियुक्त सदस्य डेव्ह सेन्सन यांनी सांगितले की, छोट्या शेतकऱ्यांशी चर्चा सुरू आहे. ते म्हणाले, आम्ही साखर आयातीवरील अवलंबीत्व कमी करू इच्छितो. जेवढ्या लवकर शक्य आहे, त्या कालावधीत आण्ही उत्पादकतेमध्ये सुधारणा करू इच्छितो. चांगल्या उत्पादनासाठी ऊस जास्त काळ वाढू देणे हा उपाय असेल, तर एसआरए शेतकऱ्यांना होणारा फायदा लक्षात घेऊन त्याची अंमलबजावणी करेल.