बकोलोड सिटी : साखर कारखाने नियमित हंगामाच्या आधी पुन्हा सुरू केल्याबद्दल नेग्रोस ऑक्सिडेंटलचे व्हाईस गव्हर्नर जेफरी फेरर यांनी आभार मानले आहेत. आता साखरेची टंचाई दूर होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. फेरर यांनी सांगितले की, जेव्हा साखर कमी असल्याची अफवा पसरली होती, तेव्हा मी साखर कारखान्यांना गळीत हंगाम सुरू करण्याचे आवाहन केले होते. ते म्हणाले की, आमच्या साखर कारखान्यांनी खूप अनुकूल प्रतिक्रीया दिल्याबद्दल मी खूप आभारी आहे.
साखर कारखाने सुरू झाल्याने शेतकऱ्यांचाही फायदा होत आहे. फेरर यांनी सांगितले की, फर्स्ट फार्मर्स, हवाईयन फिलिपाईन्स कंपनी, व्हिक्टोरिया मिलिंग कंपनी, यूआरसी ला कार्लोटा आणि सागे सेंट्रल साखर कारखाना सुरू झाला आहे. शुगर नियामक प्रशासनाने (एसआरए) वर्ष २०२२-२३ गळीत हंगामात जवळपास ३,००,००० मेट्रिक टन साखर उत्पादनाचे अनुमान व्यक्त केले आहे.