मनिला: प्रसार माध्यमांतील वृत्तांनुसार, यंदा ला निनाचा दीर्घ प्रभाव देशाच्या साखर उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे साखर उत्पादन २.१ मिलियन मेट्रिक टनाच्या आपल्या उद्दिष्टापेक्षा थोडे कमी म्हणजे दोन मिलियन टनापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
ऊस उत्पादक राष्ट्रीय महासंघाचे (एनएफएसपी) अध्यक्ष एनरिक रोजेज यांनी सांगितले की, १४ मार्चअखेर आमचे साखर उत्पादन १.४ मिलियन मेट्रिक टन झाले आहे. सध्याच्या गळीत हंगामातील काही महिने शिल्लक आहेत. सध्या पुरेशा उसाची तोडणी झाली आहे. आम्ही चांगले हवामान आणि चांगल्या उत्पादनाची अपेक्षा करीत आहोत. मात्र, जास्तीत जास्त दोन मिलियन टनापर्यंतच साखर उत्पादन शक्य आहे.
गेल्या आठवड्यात, साखर नियामक प्रशासनाने (एसआरए) २०२०-२१ या हंगामासाठी सुधारित पिक आदेश लागू केला. त्यानुसार, चालू वर्षीचे साखर उत्पादन १०० टक्के स्थानिक बाजाराला देण्यात येणार आहे. यापूर्वी देशात साखरेचे ९३ टक्के उत्पादन देशांतर्गत बाजारपेठेत तर ७ टक्के साखर अमेरिकन बाजाराला दिली जात होती. मात्र, उत्पादन घटल्याने अमेरिेकेला होणारी साखर निर्यात रद्द करण्यात आली आहे.