फिलीपाईन्सच्या साखर नियामक प्रशासनाने म्हटले आहे की, देशात सध्या साखरेच्या आयातीची गरज नाही. नियामक प्रशासनाचे प्रमुख हर्मिनेगिल्डो सराफीफा म्हणाले, साखरेचा पुरवठा कमी असतो, त्यावेळी साखरेची आयात हा एक नेहमीचा पर्याय असतो. परंतु आता साखर आयात करण्याची गरज भासणार नाही.
नुकतीच, देशामध्ये साखरेचे दर वाढू नयेत म्हणून साखरेच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी एसआरए ने देशांतर्गत उत्पादनातील तूट भरुन काढण्यासाठी 250000 मेट्रीक टन साखरेच्या आयातीला परवानगी दिली होती. हा आयातीचा उपक्रम खाद्य, कन्फेशनरी, बिस्किट, पेय उत्पादक, ग्राहक आणि विक्रेते, व्यापारी, रिटेलर्स आणि साखर कारखाने तसेच व्यापार्यांसाठी खुला होता. 100000 मेट्रीक टन उद्योजकांसाठी तर उर्वरीत 150000 मेट्रीक टन ग्राहक आणि साखर उत्पादकांसाठी खुले होते. सराफीफा म्हणाले, आयात केलेली साखर 31 ऑक्टोबरपर्यंत येईल आणि पुढील काही वर्षांपर्यंत ती चांगली राहील. याउलट, एसआरए ला विरोध करणारा वित्त विभाग स्थानिक साखर उद्योगात सुधारणा घडवून आणण्यावर भर देत आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.