मनिला : देशातील सध्याची साखर पुरवठा टंचाई कृषी विभाग (DA) आणि SRA द्वारे लवकरच सोडवली जाईल, असे शुगर रेग्युलेटरी ॲडमिनिस्ट्रेशनचे (SRA) चे नवनियुक्त बोर्ड सदस्य ऑरेलिओ गेरार्डो वाल्देरामा जूनियर यांनी म्हटले आहे. ऑरेलिओ गेरार्डो वाल्डेरामा ज्युनियर म्हणाले की, मला खात्री आहे की कृषी विभाग पुढील दोन आठवड्यांत ही समस्या सोडविण्यात सक्षम होईल. देशात अपुरा पुरवठा आणि मागणी वाढल्यामुळे गेल्या एका आठवड्यात साखरेचे दर प्रती किलो PHP१०० पेक्षा जास्त झाले आहेत.
यावेळी वाल्देमारा यांनी खते आणि इंधनाच्या वाढत्या किमती हे साखर उद्योगासमोरील प्रमुख आव्हानांपैकी एक असल्याचेही मान्य केले. साखर उद्योगाने छोट्या ऊस शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी काम करायला हवे, यावर वाल्देरामा यांनी भर दिला.