मनिला : तांदुळानंतर फिलिपाईन्सने देशांतर्गत साखरेचा दर स्थिर ठेवण्यासाठी साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत Sugar Regulatory Administration (SRA) ने सांगितले की, पिक हंगाम २०२१-२२ मध्ये २,००,००० मेट्रिक टन साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. एसआरएनने कृषी विभागाला सांगितले की, उच्चस्तरीय साखरेच्या किमती सध्याच्या स्तरावर नियंत्रण करण्याचे आदेश मिळाले आहेत. त्यामुळे साखर आयातीचा निर्णय घेतला आहे. एसआरएने सांगितले की, ही आयात १,००,००० मेट्रिक टन मानक ग्रेड रिफाइंड साखरेची असेल. तर उर्वरीत १,००,००० मेट्रिक टन साखर शीतपेय उद्योगासाठी वापरल्या जाणाऱ्या बॉटलर्स ग्रेड रिफाइंड साखरेची असेल. एकूण आयात साखर उत्पादकांच्या शिफारशींपेक्षा अधिक आहे.
वादळामुळे झालेल्या नुकसानीमुळे पिक वर्ष २०२१-२२ पर्यंत कच्च्या साखरेच्या उत्पादनाचे अनुमान २.०९९ मिलियन मेट्रिक टनापासून घटवून २.०७२ मिलियन मेट्रिक टन करण्यात आले आहे. याबाबत विक्मिको प्लांटर्स असोसिएशनचे अध्यक्ष ऑरेलियो वाल्डेरामा यांनी सांगितले की, त्यांनी दर महिन्याला केवळ ५०,००० मेट्रिक टन साखर आयात करण्याची शिफारस केली होती. त्यास कॉन्फेडरेशन ऑफ शुगर प्रोड्यूसर्स असोसिएशन इंक. नेग्रोस आणि इतर साखर उत्पादकांनी सहमती दर्शवली होती.