फिलिपाइन्स सप्टेंबरमध्ये आणखी १,५०,००० मे. टन साखरेची करणार आयात

देशांतर्गत पुरवठ्यातील तुटवडा दूर करणे आणि साखरेच्या किमती स्थिर राखण्यासाठी फिलिपाइन्स सप्टेंबरच्या पंधरवड्यापर्यंत १,५०,००० मेट्रिक टन रिफाइंड साखर आयात करणार आहे.

कृषी सचिव आणि साखर नियामक प्रशासक (एसआरए) बोर्डाच्या अध्यक्षांच्या रुपात राष्ट्रपती मार्कोस यांनी साखर आदेश ७ (एसओ ७) ला मंजुरी दिली आहे. यामध्ये या वर्षीच्या दुसऱ्या आयात कार्यक्रमाच्या मआध्यमातून १,५०,००० मेट्रिक टन प्रक्रिया केलेली साखर आयात करण्याबाबत माहिती देण्यात आली आहे.

याबाबत कृषी विभागाचे वरिष्ठ अवर सचिव डोमिंगो पंगानिबन, एसआरएचे कार्यवाहक प्रशासक पाब्लो लुइस अजकोना आणि कार्यवाहक एसआरए बोर्डाचे सदस्य-कारखानदारांचे प्रतिनिधी मित्जी मांगवाग यांनी स्वाक्षरी केली आहे.
नव्या आयात कार्यक्रमातर्गत देशांतर्गत खप आणि साखरेच्या पुरेशा वास्तव पुरवठ्यासाठी दोन महिन्यांचा बफर स्टॉक सुरक्षित ठेवण्यात येणार आहे.

या ऑर्डरमध्ये म्हटले आहे की, २०२२-२३ मध्ये साखर ऑर्डर ६ आयात कार्यक्रमाची श्रृंखला सुरू असतानाही कारखाने लवकर सुरू होणे आणि लवकर बंद झाल्यामुळे पिक वर्ष २०२२-२३ साठी साखर उत्पादनाचे प्रमाण आणखी कमी होईल असे अनुमान आहे. पुरवठ्यातील संभाव्य तूट भरुन काढणे आणि मागणीदरम्यानचे अंतर कमी करण्यासाठी SRA ला CY २०२२-२०२३ मधील मागणी पूर्ण करण्यासाठी दूसरा आयात कार्यक्रम सुरू करणे गरजेचे वाटते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here